कोरोना पॅकेज : खासगी रूग्णालयांकडून ‘लूट’

Foto
 पाणी बॉटल 40 रुपयांना स दानशूरांना नो एन्ट्री 
 गोलमाल है सब गोलमाल
अवघ्या वीस रुपयात रुग्णांना जेवण देणार्‍या दानशूरांना वेशीवर टांगत महानगरपालिकेने कंत्राटदारांवर कोट्यवधींची खैरात केली. मोठी कंत्राटे देऊन जेवणावळी च्या पंगती उठल्या दुसरीकडे खासगी रुग्णालयांमध्ये पॅकेजच्या गोंडस नावाखाली पाणी बाटली चक्‍क 40 रुपयांना रूग्णांच्या माथी मारून लोक केली जात आहे या लूट पॅकेजला प्रशासनाचा वरदहस्त असून कंत्राटदाराचे चोचले पुरवण्यासाठीच दानशूरांना कात्रजचा घाट दाखवण्यात आल्याचा आरोप आता होतो आहे.
कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर जेव्हा क्‍वारंटाईन सेंटर भरू लागले तेव्हा शहरातील एका दानशूर व्यक्तीकडून मनपाने जेवण मागवले. रात्री-बेरात्री केव्हाही मनपाचे पथक या व्यक्तीला निरोप देत. आम्हाला शंभर प्लेट हव्यात, सदर दाते मनपाला तातडीने जेवण पुरवठा करीत. वरण-भात-भाजी-पोळी आणि गावरान तुपात गोड पदार्थ असे पौष्टिक जेवण अवघ्या वीस रुपयात दिले गेले. प्रारंभी तब्बल महिनाभर मनपाने याच दानशूरांकडून जेवण मागविले. एवढेच नव्हे तर दानशूर सामाजिक संस्था अत्यंत नाममात्र दरात रुग्णांना जेवण देण्यास तयार झाल्या. अनेक दानशूरांनी मनपाचे उंबरठे झिजवले. मात्र कंत्राटदारांची चटक लागलेल्या प्रशासनाने प्रत्येक गोष्टीचे कंत्राट देऊन अनेकांचे पोषण केले.
20 रुपयांचे नाकारले दिले 180 रुपयाला !
दरम्यान, महानगरपालिकेने रुग्णांना चहा नाश्ता जेवण याचे कंत्राट निरनिराळ्या कंत्राटदारांना देत कोट्यवधींची लूट केली. शहरात वीस रुपया जेवण उपलब्ध असताना मनपा प्रशासनाने तब्बल दीडशे ते दोनशे पेपर प्लेट जेवण देण्याची कंत्राटदारी दिली. गेल्या चार पाच महिन्यात अनेक कंत्राटदारांवर धन वर्षाव केला. अनेक जण बदलले तर नव्यानी किंमत वाढवून मनपाची झोळी रिकामी केली. एकंदरीत या खानावळीचा धंदा जोरात सुरू आहे.
खाजगी रुग्णालयांचे पॅकेज !
खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची पॅकेजच्या गोंडस नावाखाली अक्षरशः लूट केली जात आहे. दिवसाकाठी चार हजार रुपयांपासून वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस आहेत. यात पीपीटी, डॉक्टरचे व्हिजिट या सहज जेवण नाश्ता पाणी बॉटल यांचाही खर्च समाविष्ट आहे.  विशेष म्हणजे तब्बल 40 रुपयांना पाणी बॉटल  रुग्णांच्या माथी मारल्या जात आहे. हा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट असल्याने त्याचा बिलात वेगळा अंतर्भाव होत नाही. त्यामुळे बिल तपासणीसाठी नेमलेल्या सीए च्याही लक्षात ही बाब येत नसल्याचे दिसते. एकूण बिलाच्या तब्बल 40 टक्के रक्कम नाश्ता, जेवण, गरम पाणी इतर गोष्टींसाठी वसूल केली जाते. रुग्णांचे जेवण नाश्ता जर दानशूरांकडून मागवला तर रुग्णाचे तब्बल 40 टक्के बिल कमी होऊ शकते. मात्र रुग्णालयांना हे करायचे नाही.
 नाममात्र दारात सामाजिक संस्था, दानशूर रुग्णांना चहा, नाश्ता, जेवण देण्यास तयार असताना त्यांना प्रवेश बंद करण्यात आला. अनेक दानशूरांनी खाजगी रुग्णालयांची उंबर्डे झिजवले मात्र सर्वाधिक कमाईचे काम रुग्णालयाने स्वतःकडेच ठेवले. आज रूग्णालय पॅकेजच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत आहेत.
हेडगेवार रुग्णालयाचा आदर्श !
कोरोना महामारीच्या ककाळात सर्वसामान्य आर्थिक अडचणीत असताना रुग्णालयांनी लुटीचा राजमार्ग अवलंबला आहे. अशाही परिस्थितीत शहरातील हेडगेवार रुग्णालयाने मात्र रुग्ण तसेच सोबतच्या नातेवाईकांना मोफत नाष्टा जेवण देण्याचा वसा कायम ठेवला. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कोरोना काळातही अबाधित राखत रुग्णालयात मोफत जेवण सुरू आहे.
 कोरोना रुग्णाला किमान आठ-दहा दिवस रुग्णालयात थांबावे लागते. अशा परिस्थितीत त्याच्यासह नातेवाईकाला नाष्टा जेवण मोफत देण्यात येते. त्यामुळे रुग्णाचे दहा दिवसात किमान सहा ते सात हजार रुपयांची बचत होते. हे रुग्णालय जर अशी व्यवस्था करू शकते तर इतर रुग्णालयांनी करायला नको का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
लूटीला असाही वरदहस्त !
गेल्या पाच महिन्यांपासून होत असलेल्या या लूटीला प्रशासनाचा वरदहस्त आहे. महानगरपालिकेने शासनाच्या पैशाची बचत व्हावी असा कधीही प्रयत्न केला नाही. वीस रुपयांना सहज उपलब्ध होणारे जेवण 180 रुपयात घेतले. उंबरठे झिजवूनही दानशूरांना मनपाने प्रवेश दिला नाही. कंत्राटदारांवर कोट्यवधींची खैरात केली. दुसरीकडे खाजगी रुग्णालयांनीही पॅकेज च्या नावाखाली सर्रास लूट चालवली आहे. त्यावरही अंकुश ठेवण्यात आला नाही. परिणामी रुग्णाच्या बिलात तब्बल 40 टक्के खर्च अन्न पाण्यावर होतो आहे.
महानगरपालिका कुठे कुठे लक्ष देणार ?
 खाजगी रुग्णालयांनी जेवण आणि पिण्याच्या पाण्यावर किती खर्च करावा, हा त्यांचा प्रश्न आहे. महानगरपालिकेने मात्र चांगली व्यवस्था केली आहे. 
-नीता पाडळकर,
 वैद्यकीय अधिकारी मनपा
8चहा दोन वेळ - 20 रुपये
8नाश्ता : 50 रुपये
8दुपारचे जेवण : 250 रुपये
8रात्रीचे जेवण : 250 रुपये
8पाणी बॉटल : 30 ते 40 रुपये
8त्याच बरोबर गरम पाणी बिस्किट
यासह रुग्णाने इतर काही पदार्थ मागवले तर त्याचा खर्च बिलामध्ये समाविष्ट होतो.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker